प्रेमातील कळ

सोसवत नव्हती साधी साधी कळ,
आज एवढे कुठून आले बळ,
एवढे सोसूनही पुरून उरतोय,
पूढे ही तुझ्याच भेटीची कामना करतोय.

विरहात आज वर्षे लोटली,
हुल्लड बाजीतून जाणीव गाठली,
जुनी कातडी दिली सोडून,
जीवनात क्रांती आली घडून.

नंतर एवढ्या वर्षाचे अंतर गाठले,
बरेच काही वाटले आणि गोठले,
पण तुझी आठवण, प्रेम तसेच राहिले मनात,
आवडले पोळत राहणे विरहाच्या उन्हात.

एवढी वर्षे सोसले विरहाचे सारे हाल,
पण कधी डगमगली ना माझी चाल,
पटले प्रेमात असते खूप शक्ती,
अशीच करत राहीन तुझी भक्ती.