मदत

कशी झाली समजूत मनाची,
मदत घेतलीस काय कुणाची,
असल्यास आता तू कर माझी मदत,
मला तर तुझ्याच मदतीची आहे आदत.

माझ्यावरून हाटवले नव्हते कधी ध्यान,
पण एवढ्या वर्षात जमलय तुला छान,
मी विसरण्याच्या प्रयत्नाने थकलो,
पण प्रत्येक प्रयत्नात कुठे तरी चुकलो.

म्हणून तुला विसरणे नाही जमले,
तुला शोधण्यात नि आठवण्यात मन रमले,
मनास कोणता दाखवू आता रस्ता,
कशा कमी होतील त्याच्या खस्ता.

मला ही दाखव तू अनुसरलेले पथ,
तुला माझ्या प्रेमाची देतो शपथ,
तुला विसरायचे असे खूप वाटते,
पण जागो जागी तुझी आठवण भेटते.