मागतोय माफी

तुला त्रास दिल्याचे मानतो,
आठवून कधी डोळ्यात पाणीही आणतो,
पण आता याचा धरू नको राग,
पश्चातापाने कधीच आले मला जाग.

होतो मी हुल्लड थोडा,
विपर्यासी वाटायचा आपला जोडा,
“तुमचे कसे पटेल” विचारायचे मित्र,
त्यांना ऐकवायचो प्रेमाचे सूत्र.

पण सुधरण्याचे घेतले नाही नाव,
तुझ्या मनाला दिले असंख्य घाव,
सहन केलेस सारे होऊन स्तब्ध,
आणि कंटाळून गेलीस दूर बनून निशब्द.

तीथपासून तुझ्याशी मागतोय माफी,
कळतं माझ्यासाठी नसेल ती सोपी,
पण देतोय केल्या प्रेमाची आण,
कमी नको होऊ देऊ त्याची शान.