राहिली कसर

कळे ना कोणती राहिली कसर,
पण तुझा पडलाच ना विसर,
एवढ्या वर्षात विसरलो घर आणि देव,
पण तुझी आठवण राहिली सदैव.

वाटते आता आलो संपाय,
ज्ञात सारे केले उपाय,
राहिला ना समजून आमका तमका,
तरी सापडेना उपाय नेमका.

उपायच ना ज्ञान हि पडते तोकडे,
आता कुणाकडे घालू साकडे,
देव आणि घर दूर आहेत सारले,
तुझे नाव तर नसा नसात आहे मुरले.

विचार करतोय आता काय करू,
तुझ्याशिवाय कोणाला मस्का मारू,
म्हणून तुला विसराया तरी दे हात,
वचन देतो करेन आठवणींवर मात.