लक्ष

तुझ्या शोधात नेहमीच राहिलो दक्ष,
तरी होत राहिलो अपयशाचा भक्ष,
पण कधी सोडले ना पुनर्भेटीचे लक्ष,
माझी प्रत्येक हलचाल देईल याची साक्ष.

तू गेलीस पण आठवण ना झाली दूर,
तिनेच बनवले मला एवढा शूर,
अज्ञात शत्रू सोबत आहे लढत,
अपयश येते तरी आहे नवे मार्ग काढत.

मार्गी काटे तर कधी येतात काचा,
रक्त बंबाळ होतात टाचा,
गरजेचं असत खूप उपचार,
पण थांबण्याचा येत ही नाही विचार.

जीवनभर हा शोध चालू ठेवीन,
लक्ष तेच, मार्ग शोधेन नवीन,
कुठेतरी दिसेनच दे एक साद,
वचन देतो बोलशील तो धरेन नाद