वादळ

थोडे तरी पाठचे आठव,
शमलेले वादळ पुन्हा उठव,
मी ना उरलो आता वादळी छावा,
माझ्याकडे उरलाय केवळ आशेचा ठेवा.

तुझ्यापासून दुराऊन नाही पचले,
तरी डोळ्यात अश्रू नाही साचले,
निखळलेल्या अश्रुना टाकले पुसून,
हिम्मत भरली स्वतःत ठासून.

आणि मग तुझ्या मोहिमेला लागलो,
तुला आठवण्यात आणि शोधण्यातच जगलो,
तुझ्याशिवाय जगणे नाही हेच होते पटले,
एक वेगळेच वादळ होते उठले.

या वादळाने घोंगावत चोहीकडे पाहिले,
पण त्यास इच्छित दिसायचे राहिले,
अनोळखी धूळ आणि बेलगाम वारे,
धूसर करून टाकले आसमंत सारे.

मात्र कालांतराने निघाला तो मोडीत,
मौनाने तुझ्या सापडला कोंडीत,
दैव याच्याच प्रतीक्षेत होता उभा,
सावरण्या हि ना मिळू दिली मुभा.

मात्र सावरण्या तुझी उरले आस,
पाठचे आठउन बदलू शकतेस रास,
प्रेम राखणे आता तुझ्याच हाती,
आठव कशी आपली प्रीत होती.