विरहा विरुद्ध

कसे तुला विरहाचे पटले ?
मला कधीच भेटावेसे नाही वाटले ?
एवढी कशाने तू निष्ठुर झाली ?
कोणीच उरला नाही मला वाली ?

निराळी होती लोकांची गोष्ट,
पण तुझ्या प्रेमाने मन झालय उष्ट,
हे बाटलेले मन कसे कुणाला दाखवू,
तुझ्याशिवाय कुणाच्या आठवणीत माखवू.

लहान बाळासारखे केलेस लाड,
संस्कारांनी फुलवलेस व्यक्तिमत्वाचे झाड,
एक तुझ्याच समोर तन मन झुकले,
तुझ्याशिवाय कुणाचे ना ऐकले.

म्हणून कधी केला नाही विरहाचा स्वीकार,
वाढवत गेलो प्रेमाचा विकार,
आता तो कधीच होणार नाही बरा,
विरहा विरुद्ध चढतच राहील पारा.