व्याधी

बर्‍याच जडल्यात व्याधी,
पण काळजी ना त्यांची साधी,
आठवण येते तुझी आधी,
पण तुला हे कळणार कधी.

तू जाण्याने प्रचंड झाली हानी,
हरवली ऐपत सारी जुनी,
वेळेवर नसायचे अन्न ना पाणी,
तुझाच विचार ध्यानी मनी.

परिणामी खालावली प्रकृती,
बदलली जुनी ऐटदार आकृती,
डॉक्टर म्हणे तुला अशक्तपणा आला,
पण मनाचे हाल दिसेना त्याला.

व्याधीवर तूच एक आहेस दवा,
म्हणूनच तुझाच करतोय धावा,
एकदाच भेट मागत नाही जास्त,
तुझ्याच हाती करणे व्याधींचा अस्त.