शक्य असल्यास

शक्य असल्यास मोज,
विरहात घालवले किती रोज,
कळते आज शक्य नाही करणे गणती,
पण एकदा आठव हीच आहे विणती.

एवढा जीव लावला दोघांनी,
वाहवा केली ही चार चौघांनी,
लाभ असा मिळतो कोणा कोणाला,
बाकी समजावतच राहतात आर्त मनाला.

पण नंतर आपल्यातही असेच घडले,
नियतीने दिलेले अंतर पडले आणि वाढले,
कळले ना फळ हे कोणत्या कर्माचे,
म्हणून पालन करत गेलो प्रियकर धर्माचे.

तिथपासून दररोज तरसतोय तुझ्या भेटीला,
आठवण घट्ट बांधली पाठीला,
पण वर्षानुवर्षे अपयशानेच रोज आहे सरत,
म्हणूनच तुला आठवण्याची विनंती आहे करत.