शोधून काढेन

मी डोळे बंद करतो,
श्वास मुठीत धरतो,
केंद्रित करतो लक्ष,
सर्वांगाने होतो दक्ष.

तू तिकडे मला आठव,
आठवणींचे वादळ उठव,
एकदाच घे माझा श्वास,
होऊ ना देणार त्या क्षणाचा नास.

पकडेन सारी ध्वनी लहर,
ओळखेन ते गाव की आहे शहर,
उतरणीला उत्तरेन चढणीला चढेन,
पण ठिकाण तुझे शोधून काढेन.

पण मग वेळ ना दवडणार,
तेच करणार जे तुला आवडणार,
घेईन तुझा निर्णय ऐकवून सारे हाल,
त्यावरून ठरवेन पुढील वाट चाल.