सन्यास

तारुण्यही निट नाही पाहिले,
वाटते म्हातारपण दूर नाही राहिले,
आता सर्वस्व सोडून सन्यास घडवा,
त्यातून तरी तुझा विसर पडवा.

तसे कोवळे होते प्रेमाचे वय,
नव्हते त्यास नियतीचे भय,
खरतर तिच्या ताकदीची नव्हती ओळख,
डोळ्यावर होता हुल्लडबाजीचा काळोख.

तरी उतरली नाही माझी रग,
तुझ्या आठवणीने भरून राहिले जग,
नंतरची वर्षे तुला शोधण्यात घालवली,
हरलो नाही दाखवत नियतीला जळवली.

पण उपयोग झाला शुन्य,
ना तिने ना तू हे केले मान्य,
असे असताना कुणासाठी जगावे,
त्यापेक्षा भले एकांत सन्यास भोगावे.