सांग

सांग कुठे आवडेल भेटायला येणे,
येताना कविता कि गाऊ प्रितीचे गाणे,
तुझ्या होकाराची आहे एक कमी,
तुझ्या मनासारखं होईल देतो हमी.

यासाठी आहेत मी कष्ट भोगले,
आठवणीत आहेत दिवस रात्र जागले,
नयने अश्रुनी झाली ओली,
केवळ देवाशीच सार्‍याची तक्रार केली.

पण देवाकडेही तक्रार नाही चालली,
त्याला कुठे आहे प्रीत कळली,
शेवटी एकटाच राहिलो तुझा शोध घेत,
पण अद्याप हि तू नजरेत नाही येत.

शेवटी तुझ्याच आलो पायी,
तुझ्या भेटीची झाले घाई,
बाकी सारं माझ्यावर सोपव,
पण तू केवळ ठिकाण दाखव.