इशारा

शहर असो वा असो गाव,
सांगायची गरज नाही नाव,
केवळ इशारा पुरेसा ठरेल,
बुडणारे मन त्या आधारे तरेल.

पुनर्भेटीसाठी व्याकूळ आहे मन,
त्यासाठी अर्पले तन मन धन,
पण काही केल्या यश ना मिळे,
सारे प्रयत्न झाले खिळ -खिळे.

मनापासून शोधल्यास सापडते लंका,
म्हणून माझ्याच प्रयत्नांवर घेतोय शंका,
प्रयत्न असावे कमी पडले,
म्हणूनच दैव न पावण्यावर अडले.

आता तुझ्यासाठी तुझीच उरले आशा,
तूच बदल माझी दिशा आणि दशा,
इशार्‍यानेच कळव तुझे गाव,
बघ कसा उधळतो विरहाचा डाव.