करेन पण

विसरेन तुझे नाव,
आणखी नाही सोसणार घाव,
नाही देणार तुला भाव,
सुरु करेन नवीन डाव; पण ….

तुलाही असे लागेल करावे.
आणि केल्याचे द्यावे लागतील पुरावे.

नाही घेणार तुझा शोध,
नाही करणार विरहाचा क्रोध,
नशिबी आलेले करेन मान्य,
आणि कमवाया लागेन धन धान्य; पण ….

नाही गाणार तुझी गाणी,
नाही आणणार डोळ्यात पाणी,
लुटेन सारी जीवनाची मजा,
तुझ्या दुखःला करेन त्यातून वजा; पण ….

विसरेन तुझी अनमोल प्रीत,
मोडेन सच्चा प्रियकराची रीत,
लागेन नव्या प्रीतीच्या मागे,
तिच्यासाठी राहीन रात्री जागे; पण ….

कधीच मारणार नाही हाक,
दिलेल्या सादिची करेन राख,
परक्या हकाना देईन साद,
त्यांच्या रोमांच्यात होईन बाद; पण ….

शेवटी मनातून तुला काढून टाकेन,
पुनर्भेटीचा हट्ट दूर फेकेन,
तुझ्यासोबतच्या आयुष्याचे करेन हवन,
सुरु करेन माझे नवे जीवन; पण

तुलाही असे लागेल करावे.
आणि केल्याचे द्यावे लागतील पुरावे.