चव

ना साखर लागते गोड,
ना आंबट लागते आंब्याची फोड,
सारे आयुष्यच झाले बेचव,
यावर तूच मार्ग सुचव.

खाल्लाय तुझा उस्टा घास,
साध्या भाजीलाही असायचा खमंग वास,
खाऊन तासंतास लागत नसे भूख,
तेच अनुभवले शेवटचे सुख.

पण फार काळ टिकली ना ही गोडी,
दैवाने मारलीच कटूतेवर आडी,
म्हणे जास्त गोडव्याने होते स्वास्थ्याची हानी,
विरह हाच यावर औषध गुणी.

पण मान्य ना मला चव करपलेली,
परत हवीस अन्नपूर्णा हरपलेली,
म्हणूनच इतकी वर्षे घेतोय तुझा तपास,
त्यासाठी घडवेन वाट्टेल तेवढा उपास.