तुझ्याच हाती

ना गल्ली ना सोडली दिल्ली,
उनाड झालोय मी म्हणतात हल्ली,
पण माझ्याकडेही उरला ना चारा,
तुझ्या शिवाय ना व्हायचा मला कोरा.

नाही माझ्याकडे गुप्तहेर खाते,
तरी कुठूनतरी तुझी खबर येते,
खबरीच्या पाठी असतो धावत,
पण शेवटी ती नाहीच पावत.

पण म्हणून थांबवत नाही प्रवास,
दिवस रात्र कष्ट घेतो जीवास,
कधीतरी यश येईल पाई,
म्हणून थकवा पळवायला ही करतो घाई.

घाई तुझ्याकडून ही अपेक्षित अशी,
तरच आपली आणि विरहाची बदलेल राशी,
कमी पडतात आता एकट्याचे श्रम,
तुझ्याच हाती आता वाचवणे आपले प्रेम.