पुन्हा नव्याने

केवळ एकदाच बघ वळून,
राग तुझा नक्की पडेल गळून,
जगण्याला नव्याने सुरुवात करू,
जुनीच प्रेमाची वाट पुन्हा नव्याने धरू.

दुरावलो तेंव्हा नव्हते भान,
पण आता चांगलीच आले जाण,
जुन्या चुका ना पुन्हा होणार,
आता ना नुसती बडबड गीते गाणार.

सोबत असताना तू घेत होतो भरारी,
पण आज तेवढा राहिलो नाही करारी,
म्हणूनच सारे प्रयत्न गेले वाया,
आता तूच दाखव थोडी दया.

देतो वचन पुन्हा ना घडणार त्या चुका,
तोंडच्याच नाही तर मनाच्या ऐकेन हाका,
घट्ट धरून ठेवीन तुझा हात,
जन्मो – जन्मीच्या विरहावर करेन मात.