अपयश

जितके अपयशाने उडवले,
तितकेच त्याने घडवले,
कधी कधी उर येते दाटून,
तरी मार्गात आहे दटून.

माहित नाही तुला किती ज्ञान,
पण मी नेहमी ठेवली वचनांची जाण,
तू घातलेली शपथ कशी मोडणार,
असे पाप माझ्याकडून नाही घडणार.

भले सोसेन सारे हाल,
सोडेन विकासाची चाल,
आयुष्भर एकटा राहीन,
अंत क्षणी तुलाच डोळे मिटून पाहीन.

पण हि भूमिका झाली टोकाची,
मी स्वप्ने सोडली नाहीत सुखाची,
म्हणूनच आजही तुझ्या शोधत फिरतोय,
अपयशी तरी लढवय्या ठरतोय.