आंगण

सारी दुनिया मानली आंगण,
पार केले सारे रिंगण,
ना नियम ना ठेवली नाती,
ते ते केले जे होते हाती.

एकच ध्येय सर्व मागे,
शोधायचे होते तुझे दोरे -धागे,
ती प्रीत पुन्हा करायची आहे जागी,
जिचा लौकिक कधी होता जगी.

नाही सापडलीस शोधून,
आर्त हाका दिल्या अधून मधून,
सार्‍यांकडून माहिती केली गोळा,
पण तरी तहानलेलाच राहिला गळा.

आता तूच येउन अमृत पाज,
तुझीच नितांत गरज आज,
तुझ्यासाठी अंगणी पसरवलीत फुले पाने,
गेलेले दिवस कधीच झालेत जुने.