आता नाही जमत रडणं

आता नही जमत रडणं,
सवयीचं झालयं धडपडणं,
भले नाही जमलं सावरणं,
पण जमलं सारी दुःखे आवरणं.

आज हाती आहे सरे,
तरी बरेच राहिला अधुरे,
मिळालं नाही ज्याची होती हाव,
काय कामाचं हे मिळालेलं नाव.

नको मला पैसा अडका,
नाही व्हायचा जणांचा लाडका,
एक तुझी साथ पुन्हा मिळावी,
विरह यातना इथे तरी टळावी.

त्यासाठीच अंगीकारल्या सवाई,
मनी नसताना झालो कवई,
हाका विरल्या, म्हणून गीते लिहिली,
सारी गीते तुला शोधण्यावर वाहिली.