इच्छा

तुझ्यासाठी होते जगायचे,
होते तुझ्यासाठी मरून बघायचे,
सारे करायचे होते तुझ्यावर अर्पण,
जे माझ्यात दाखवत होते दर्पण.

पण धड ना जगलो ना मेलो,
तुला शोधण्यावरच  खर्चिला  गेलो,
आता उरलोय  थोडासा शिल्लक,
आता याला तरी माणू नको शुल्लक.

वाट पाहिली तुझी खूप,
तुझ्याशिवाय ना पाहिले कोणते रूप,
तुला शोधतच राहिलो सारीकडे,
ह्रीदयाचे होतच राहिले असंख्य तुकडे.

तरीही आज रोज मरतोय तुझ्यासाठीच जगतोय,
भेटत नाहीस म्हणून रात्र-रात्र जागतोय,
काय अशीच करशील माझी इच्छा पुरी ?
नको ना ठेऊ माझी प्रीत अधुरी.