उरले ना काही

तपासली तुझी सारी नाती गोती,
पण काही केल्या लागलीस ना हाती,
आता तर अश्रू हि सुकले रडून,
एवढी कुठे बसलेस दडून.

दुरावल्यावर शोधाला लागलो,
पण चिंतेने नाही जागलो,
जाऊन जाणार कुठे असे वाटले,
कोणा आप्तेष्टाकडे असेल कोठडीत टाकले.

पण अंदाज माझा चुकला,
फसला जो डाव होता आखला,
चाचपली सारी नाती शहरे, गावे,
पण रिकामेच हात जिकडे जावे.

शोध आज हि चालू ठेवलाय,
नशीब पणाला लावलाय,
आता तूच बाहेर ये आहेस जिथून,
उरले ना काही, जीवच टाकलाय ओतून.