ऋणी

नसेल परतायचं तर नको येऊ,
पण स्वप्नी येउन आस तरी नको लाउ,
अवघड असेल तरी एकटा जगेन,
दुरूनच तुला सुखी बघेन.

तुझ्याशिवाय विचार ना केला कुणाचा,
ना कधी मोह धरला धनाचा,
तुला शोधण्यावरच खर्ची घातले श्रम,
तोडले ही असतील प्रेम आणि अपयशाचे विक्रम.

आजही नियतीशी निकराने देतोय लढा,
पण भरता भरेना नियतीचा घडा,
म्हणून तुझ्याकडे हात पसरले,
पण वाटते तुझे ही सहकार्य ओसरले.

या सार्‍याचा त्रास होतोय,
म्हणूनच तुला विनंती अर्ज देतोय,
स्वप्नी न येउन विसरायला मदत कर,
जन्मभर ऋणी राहीन असं केलस तर.