कधीतरी

आवरले सरे रडू,
घोट गिळले कडू,
कारण स्वस्त नव्हते बसायचे,
पुन्हा तुझ्याशी होते हसायचे,

कडवट पणाची सवय नव्हती,
माधुर्य होते अवती भवती,
या माधुर्यात तुझी पडली भर,
बरसली माझ्यावर अमृताची सर,

हे अमृत अचानक गेले दूर,
कसा येणार नाही अश्रूंचा पूर,
हुंदके देत मनमोकळा रडलो,
पण रडून नाही निपचिप पडलो.

कारण तसे करून नव्हता नफा,
मी ही डागल्या शोधाच्या तोफा,
कधीतरी त्याचा आवाज तुझवर जाईल,
आणि कधी तरी आपले हास्य फुलून येईल.