कळव

तुझ्यापासून काय लपवू ?
लपवलेले कुणाशी संपवू ?
सारे खरे आहे तुझ्यासमोर ठेवले,
कळव जर त्यास तुझे मन पावले.

तुझ्यावर निष्कपट जीव लावले,
पण कापटी नियतीचे इथेच फावले,
दुरावले आपणास न ऐकता आपली बाजू,
लक्ष ठेवाया विरहास केले रुजू.

डोळे भले झाले ओले,
पण त्याचे हि ना मी चालू दिले,
पुसून डोळे चालू केले हाक मारणे,
एकच काम उरले तुला शोधत फिरणे.

हाक मारुनी सुकला गळा,
सर्वांगानी सोसल्या कळा,
एवढे फिरलो कि वाटते काहीच ना उरले,
प्रत्तेक वेळी अपयशच माथी कोरले.

तरी मोडली ना जित्याची खोड,
झटतोय शोधाया यावर तोड,
दुर्लक्षित होतात तन मनाचे दुखणे,
चालूच असते नव्या योजना आखणे.

पण कमजोर ताकदीची होते जाणीव,
तुझ्या मदतीची भासते उणीव,
बरे होईल दिलास मदतीचा हात,
दोघे मिळून करू विरहाचा पात.