कसे पटले

कसे पटले तुला हे वागणे,
कसे निवडलेस माझ्याशिवाय जगणे,
केवळ पाहिलीस घरच्यांची पत,
थोडे तरी घ्यायचेस माझे मत.

तू असताना तुझ्यासाठी जगलो,
दुरावल्यावर शोधण्यात दंगलो,
थोडक्यात तुझ्यातच आहे माझे सगळे,
तुझेही यापेक्षा नव्हते वेगळे.

आनंदी व्हायचीस हसताना पाहून,
आता कसे हसवशील दूर जाऊन,
क्षणभर हसण्यासाठी तरप्ततोय आज,
नाही येत का माझ्या रडण्याचा आवाज.

करत नाही तुझ्यावर शीर जोर,
केवळ पिसारा फुलऊन नाचतोय बनून मोर,
विचार कर एकदा बसून शांत,
करू नको असा तुझा माझा आणि प्रेमाचा अंत.