कोडे

कोडे सगळ्यात मोठ्ठे,
तू आहेस तरी कुठे,
कुठे शोधायचे राहिले,
समजले तिथे शोधून पहिले.

निघून गेलीस एका एकी,
समजूनही दिली नाहीस चुकी,
नंतर अनेक दिसल्या चुका,
पण उरलेले केवळ करणे टीका.

चुका सुधरायला लागलो,
मग तुला शोधण्यात जगलो,
सारे रस्ते ठिकाणे शोधले,
पण समजलेच नाही अंतर मधले.

कधी शोधल्या वाट नव्या,
कधी खाल्ल्या नव्या शिव्या,
कधी तनाला तर कधी लागले मनाला,
पण थांबलो ना लावले प्राण पणाला.

कधीच दैव नाही पावला,
आणि प्राण बाजूलाही नाही ठेवला,
निरंतर चालू ठेवला प्रवास,
कधी आवास तर कधी विसरलो गावास.

अपयश मला नाही विसरला,
विरहाचा प्रश्नही नाही ओसरला,
शेवटी प्रश्न टाकतो तुला,
एकदा तरी भेटशी का मला ?