घसरली थोडी वाणी

कुठे तुझी प्रीत मुरली,
दुरावल्यावर जराही नाही का उरली,
माझ्याशिवाय तर घेत हि नव्हतीस श्वास,
कुठे राहिला माझा ध्यास.

पण माझी बदलली ना बाब,
हवे तर तू हि विचार जाब,
तुझ्या प्रेमासाठीच तर आहे श्वास घेत,
तुझ्या ध्यासापोटीच असतो माझा प्रत्तेक बेत.

बेतात असते तुला शोधून काढणे,
तुझ्या भीतीला कायम मोडणे,
सोपवायच आहे तुझकडे मालकी हक्क,
सार्‍यांसहित दैवालाही करायचे आहे थक्क.

म्हणूनच इतकी वर्षे तुला मारतोय हाक,
हाक मारून तारुण्याला हि आला बाक,
तरी तुझ्या काळजाला सुटले ना पाणी,
म्हणून घसरली थोडी माझी वाणी.