चोहीकडे अंधार

भले चोहीकडे अंधार मातला,
पण आधार तुझ्याशिवाय ना मिळाला ना घेतला,
एकटाच तुझ्यासाठी राहिलो लढत,
जड आयुष एकटाच आहे ओढत.

आपले वाटणारे नव्हते आपले,
त्यांनी त्यांचे हित जपले,
नंतर स्नेहाचे नाते जोडले,
पण हितासाठी आपल्याला मात्र तोडले.

का त्यांना जवळ ठेऊ,
का नको दुरावा देऊ,
म्हणूनच एकांत केले जवळ,
तुझी आठवणच ठेवली केवळ.

म्हणूनच घेतोय तुझा शोध,
तुझाच होतोय आपल्यांमध्ये बोध,
म्हणून जमेल तसे ये परत,
बसलोय तुझीच काळजी करत.