छळ आणि बळ

असहाय झाले नियतीचे छळ,
पण कधी काढला नाही मी पळ,
संघर्ष चालू त्याच जोमाने,
शोधतोय तुला नित्तनेमाने.

गळ्याला पडले कोरड,
आता होत नाही जोरात ओरड,
तरी तोंडून निघतोय आवाज हलका,
त्याला माणू नको हलका फुलका.

पत्र लिहिताना कापतोय हात,
कारण पत्त्याअभावी होतोय घात,
तरी सांभाळून ठेवलेत लिहिलेली पत्रे,
कधी कधी भिजतात पाहून नेत्रे.

हा छळ कसा संपवू,
कसा तुला सुख दाखवू,
यासाठीच सोसतोय सारी कळ,
कळेना कुठून मिळते एवढे बळ.