डोळ्यात

जे तुझ्या डोळ्यात होतें पहिले,
ते आजही आहे मनी जपून ठेवले,
तेच पहावेसे वाटते पुन्हा,
प्लीज एकदा करशील तोच गुन्हा.

मला बरेच होते नाद,
तरी तू हाकेला दिलीस साद,
एवढा लावलास माझ्यावर जीव,
तुझ्या छायेत व्हावे वाटले निर्जीव.

पण दैवाला हे नव्हतं मान्य,
त्याने मार्गी लावले शन्य,
एकजीव फेकलो गेलो एवढे दूर,
कि आज देव हि वाटायला लागला क्रूर.

सारी क्रूरता केली सहन,
पण आपल्या प्रीतीचे होऊ दिला नाही दहन,
नजर तुलाच शोधायला भिरभिरते,
अन वाचा तुझ्याच नावाचा गजर करते.

मनाने जन्मीचे नाते आहे जोडले,
म्हणूनच पुनर्भेटीची आस नाही सोडले,
मारलेल्या प्रत्येक हाकेत नाव आहे तुझे,
हे जीवन वाटू देऊ नको ओझे.

साद दिलेलीस कधी एका हाकेला,
त्याच सादेचा आज आहे भुकेला,
आज माझ्या डोळ्यात तुला सारं दिसेल,
पण लवकर परत ये हि अट असेल.