तुझा शोध

भले सोबत नसशील आज,
पण आपल्या प्रेमावर आहे नाज,
भले ते पूर्णत्वाला नसेल नेले,
पण त्याचे प्रयत्न हि संपून नाही गेले.

दैव जास्त खुश नसेल झाले,
मला हरलेले नाही लढलेले पहिले,
तुझ्या कमीने लवकरच जागलो,
लगेच तुला शोधायला लागलो.

समजलेली ठिकाणे काढली पिंजून,
रकता घामाने गेलो भिजून,
थकलो पण मानली नाही हार,
तुझ्या साठी जीवनभर खाईन हा मार.