तुझा शोध

चूक कळून चुकली,
पाऊले चालून थकली,
पण ना लागला तुझा कधी शोध,
आजही सोसतोय नियतीचा क्रोध.

गाफीलच राहिलो मी थोडा,
कळले ना समजतात मला खडा,
कळले जेव्हा तांदलातून दिला फेकून,
वर सार्‍या दिशा टाकल्या झाकून.

दिशाहीन तुझ्यासाठी राहिलो फिरत,
कशी भेटशील मला परत,
असंख्य वाटा – रस्ते पायी तुडवले,
तुझ्याच शोधत हे साहित्य घडवले.

पण वाटतं सारे गेले वाया,
कुणाचीच मिळाली नाही दया,
पाऊले – साहित्य आजही नाही थांबले,
पण विरह आणखीच लांबले.