तुझी बातमी

तुझी बातमी खरी वा असो कोरी,
समजेल तिथे मारतो फेरी,
ना पाहतो दिवस ना रात्र,
वर्षानुवषे सांभाळले हे सूत्र.

रात्री आणि दिवसाही मिळाला काळोख,
सारीकडे जाणवली अनोळख,
आशाळभूत पणे न्याहाळायचे सारे,
मग स्वीकारायचे जे आहे खरे.

चालताना कधी रुतले काटे,
कधी श्वापदांची भीती वाटे,
तरी डगमगले न पाउल,
शोधत राहिलो मिळते का तुझी चाहूल.

माहित न कधी संपेल हा प्रवास,
पोहोचेन कि नाही तुझ्या गावास,
तुला कमी नव्हता माझा हव्यास,
मग तूच का दाविस नाहीस नवा आवास.