तुझ्यासाठी

शोधून सापडले असते माणिक-मोती,
पण तुला शोधू तरी किती,
शोधायचं राहिलं कोणतं गाव – शहर ?
कमी होईच ना विरहाचा बहर.

या शोधाला वर्षे लोटली,
मौसमे आली आणि आटली,
पुन्हा येण्याची आहे खात्री,
जागवाया लागत नाही रात्री.

भेटली नवीन माणसे,
आधी शिवसे मग मनसे,
त्यांच्या हि चरणी आहे निष्ठा,
कारण नेतृत्वाच आहे द्रष्टा.

जवळ आले बरेच आणखी,
पण कसा विसरेन तुझी हुंदकी,
म्हणून मानिक-मोत्याच्या लागलो नाही पाठी,
झुरतोय आजही तुझ्यासाठी.