थांबव

विसरेन बसलेले सारे घाव,
पण कसे विसरू तुझे नाव,
कधी कळतील हे मनातले भाव,
एकदा तरी माझ्या हाकेला धाव.

तुझ्याशिवाय घेतले नाही नाव,
तुझीच हाव आणि तुझाच उरलाय भाव,
कमी होते आता देवाची भक्ती,
तुझ्या शोधत खर्चते सारी शक्ती.

तुला शोधले जिथे जमले,
त्यासाठी स्वतःला कोमले,
ना भूख ना आठवली तहान,
तरी आजही माझी प्रीत आहे गहान.

तूच संग काय करू आणखी,
आता लोक हि समजतात सनकी,
तुझ्यासाठीच सारे करतोय सहन,
आता तूच थांबव हे होणारे दहन.