दर्जा

तू आहेस चंद्राची कोर,
आणि माझ्या शब्दात उरला ना जोर,
पण या मनाची समजूत कशी काढू,
कसा पचवेल हा घोट कडू.

सार्‍यांकडून मिळाला धिक्कार,
पण तू दिलास अधिकार,
भलतीच मिळालेली उर्जा,
मित्रांत वाढलेला दर्जा.

पण या सार्‍याच्या नव्हतो पाईक,
म्हणूनच रागवले तुझे नातेवाईक,
रागऊन एवढे दिले अंतर मोठे,
कि आजही शोधतोय तू आहेस कुठे.

कळते तुझ्या मी लायक नाही,
तरी धुंडाळतोय दिशा दाही,
एकदा भेटून दर्जा घे हिराऊन,
देतो वचन त्याने हि जाईन भाराऊन.