दुरावा

दुरावा आता काही पचेना,
पण काय करावे हेही सुचेना,
कोणाकडून मिळत हि नाही मार्ग दर्शन,
कोणालाच उरले ना माझे आकर्षण.

वर्षे आपल्याला दुराउन लोटली,
लगेच पुनार्मिलानाची सूत्रे हाती घेतली,
थकलो पण बसलो ना स्वस्थ,
असं करत प्रकृती हि झाली अस्वस्थ.

तरी राहिलो ना अंथरुणाला खिळून,
तुझ्याशिवाय आराम ना हे आलय कळून,
शोध सुरु करतोय पुन्हा-पुन्हा,
शोधतोय तुझ्या खान खुणा.