दैवाचा आदेश

दैवाकडून अप्रत्यक्ष मिळाले संदेश,
एकमेकांना विसरायचे होते आदेश,
भले होती जळत प्रेमाची लंका,
तरी हे कसे जमेल यावर होती शंका.

माहित नाही तुला किती जमले,
पण मन माझे जमवताना दमले,
तरी हि त्यास जमले ना चांगले,
तुला पुन्हा शोधण्यातच ते दंगले.

चांगली दिली नशिबाने भेट,
अपयशाने होतच राहिलो शेठ,
एवढ्या श्रीमंतीचे काय काम,
चीज होतच नाही ज्यासाठी गाळतोय घाम.

तुला हे चांगले जमल्याचे वाटते,
म्हणूनच दुराउन तुला पटते,
एवढे मागून देत नाहीस दर्शन,
किमान यात दे मार्ग दर्शन,