नियतीचे छळं

असहय्य झाले नियतीचे छळं,
पण कधी काढला नाही मी पळं,
संघर्ष चालू त्याच जोमाने,
शोधतोय तुला नित्तनेमाने.

गळ्याला पडले कोरड,
आता होत नाही जोरात ओरड,
तरी तोंडून निघतोय आवाज हलका,
त्याला माणू नको हलका फुलका.

पत्र लिहिताना कापतोय हात,
कारण पट्ट्या अभावी होतोय घात,
तरी सांभाळून ठेवलेत लिहिलेली पत्रे,
कधी कधी भिजतात पाहून नेत्रे.

हा छळं कसा संपवू,
कसा तुला दुःख दाखवू,
यासाठीच सोसतोय सारी कळं,
कळेना कुठून मिळते एवढे बळं.