पत्र

तुझ्या नावे बरीच पत्रे धाडली,
पण पत्त्या अभावी सारी आडली,
कळे ना कुठली दाखवू त्यांस वाट,
समजलेत ते सारेच तर चढलोय घाट.

ना दिवस पाहिले ना रात्र,
हाडे दुखावली सुजवले नेत्र,
हाका मारून कोरडला गळा,
पणाला लावला तन मन धन सगळा.

पण अपयशी ठरला शोध सत्र,
म्हणून लिहायला घेतले पत्र,
तुझ्या आठवणीनी शब्द होतेच माखले,
जमले ते सारे पत्रांत लेखले.

पण तुझा पत्ता ना लिहिता आला,
वाटते वाया गेली सारी लेखनाची कला,
आता तूच काहीतरी मार्ग सुचव,
प्रीत आणि कला आता तूच वाचव.