प्रेमाचाच अर्थ

छोटासा दाखव धागा,
शोधून काढेन जागा,
मोडू ना देणार प्रेमाची लाज,
पण तुझ्या मदतीची गरज आज.

प्रेमाचाच अर्थ समजून घेतला,
विरहाकडे लक्ष नव्हता घातला,
जीवनी आल्यावर समजून आला चांगला,
पण – तन मन त्या दुखत नाही दंगला.

नव्हतो मी गडी तगडा,
तरी दैवाशी केला झगडा,
त्याला हि दिसू लागली असेल हार,
नवीन नाही देतोय जुनेच मार.

पण सारे जमले नाही एकल्याला,
मिळून झगडावे लागेल आपल्याला,
मी तर स्वतःला दिलाय झोकून,
किती ठेवशील स्वतःला राखून.