फिकीर

आज एक तुझीच उरले फिकीर,
नाहीतर झालोही असतो फकीर,
तुझ्या नंतर सारेच झाले भंग,
जीवनी उरला ना कोणता रंग,

तुला मानला मी एक दैव,
पुजला तुला सदैव,
त्या देवाचा ही थोडा पडला विसर,
त्याचाच तर नाही ना हा असर ?

असर विरहावारच नाही थांबला,
पुनर्भेटीचा प्रत्येक प्रयत्न अपयशाने कोंबला,
जेवढा लढलो तेवढा पडलो,
हो पण त्याने मजबूत घडलो.

मोठ्ठा ही अपयश सहज पचतो,
पुन्हा एखादा नवा मार्ग वाचतो,
पुन्हा तुझ्या शोधला लागतो,
आणि बिन फकीर आयुष जगतो.