भेटशील तेंव्हा

चालून चालून पाऊले थकली,
पण तुझ्या शोधावर ना सीमा आखली,
भरकटली, ती नेहमीच चुकली,
पण शोध मोहीम कायम राखली.

मार्ग ना आहे हा सोपा,
तरी कुठेही टाकतोय टापा,
बरेचदा काटे रूतले,
रुतवणारे ही होते आतले.

या साऱ्याची नेहमी दिलीस जान,
अंधाविश्वासाने बहिरे झालेले कान,
सारे काही दिसले भलेच भले,
कळलेच नाही कधी सारे हिरावले.

पण आज बरेच बदल झालेत,
तुझे सारे सल्ले आत्मसात केलेत,
भेटशील तेंव्हा नक्की वाटेल गर्व,
विसरशील माझ्या चुका सर्व.

बस एकदा डोळ्याच पालन फेड,
जगाला बघुदे आपले वेड,
पुर्वीच्य चुका आम्ही दोघे नाही करणार,
पण जन्मो जन्मीसाठी तुझा हात धरणार.

थकल्या पावलांवर थोडी दाखव दया,
तुझ्या शिवाय कुणाच्या येतील ते पाया,
कधीच ना थांबली भले चुकली थकली,
पण जमले ना म्हणून तुझ्यासमोर झुकली.