मदत

माझ्यासाठी केले नाहीस कमी,
आणखी हि करशील आहे हमी,
म्हणूनच मागतोय मदतीचा हात,
तूच मदत कर विसराया हा आघात.

खडतर हा प्रेमाचा निसर्ग,
तुला विसराया सापडेना मार्ग,
म्हणून ओळख माझे जीवन बेचव,
एखादा मार्ग तूच सुचाव.

आधी तुला शोधण्याचे प्रयत्न केले,
न भेटल्याने विसरण्यावर भर दिले,
दोन्ही कामी स्वतःची बुद्धी वापरली,
पण सफलता कुठे हि ना सापडली.

मग जाणवले चालणार ना तुला टाळून,
तुझ्याशिवाय अपूर्णता आली कळून,
हवे तर कोणते हि शुल्क आकार,
पण कशीही मदत कराया दे होकार.