माझा स्वर्ग

वाहिल्यात अश्रूंच्या नद्या,
सुखणार नाही अश्रुनी साध्या,
किती मांडू केल्या प्रयत्नांच्या याद्या,
शेवटी यशासाठी बघावं लागतंय उद्या.

दुरावल्यावर वेळ नाही दवडला,
शोधाचा मार्ग सुरुवातीलाच आवडला,
कधी जवळ तर कधी शोधले दूर,
त्यासाठी कधी लाचार तर कधी झालो शूर.

पण शूरता निष्फळ ठरली,
पुन्हा प्रयत्ने शिल्लक उरली,
लाचारी हि कमी ना आली,
उगाच झुकवली मान खाली.

पण त्याच अश्रूंची आहे शपथ,
भले असेल दैव कोपत,
सोडणार नाही धरलेला मार्ग,
मग हाच माझा नर्क आणी हाच माझा स्वर्ग.