वाटा

अवघड तुझ्या शोधाचा घाट,
नाही सापडत नेमकी वाट,
तश्या चोखाळल्या बऱ्याच वाटा,
पण अद्याप मिळेना माझा वाटा,

वाटा नव्हत्या सरळ,
माणुसकीने होत्या विरळ,
अधे मध्ये भेटलेही जंगली प्राणी,
पण भीती धरली ना मनी,

चालून चालून पाय दुखले,
तहानेने कंठ सुकले,
विश्रांती घेतो क्षणभर,
पण ती मनाला मिळत नाही कणभर,

पुन्हा नव्या वाटा चोखालतो,
जुनेच खेळ नव्याने खेळतो,
अशाने बनवले स्वताला कणखर,
गाठेनच एकदा तुझे शिखर.