शब्द-कला

तुला कशी समजूत देऊ ?
त्यासाठी सांग कोणते गीत गाऊ ?
वाया नाही ना गेली आजवरची गीते ?
सारे शब्द तुझ्यासाठीच होते.

तू गेल्यावर उरले ना काही काम,
जपत राहिलो तुझे नाम,
पुनर्भेटीच्या हट्टावर राहिलो ठाम,
शोध कार्यात गाळत राहिलो घाम.

शोधूशोधून जातो थकून,
तिथे शब्दांनी जातो माखून,
चालू करतो शब्दांचे पूल बंधने,
प्रयत्न करतो त्यांनी संपर्क साधने.

पण अद्याप यश मिळाले ना मला,
भीती वाटते वाया गेली का माझी कला,
जे असेल ते सांग एकदाचे खरे,
किती जोपासू जगणे आणि शब्द कोरे.