शेवटची दे खबर

भले तुला माझ्यापासून तोड्डले,
पण तू देश तर नाही ना सोडले,
कुठे ठेवले तुला बंदी,
निसटण्याची मिळत नाही का संधी.

मी तर एक हि संधी नाही सोडत,
नव्या मार्गांचा असतो शोध काढत,
कधी शहर तर कधी गाव,
सारखा शोधतो तुझा ठाव.

असे करत बराच शोधला प्रदेश,
पण अद्याप सफल ना झाला उद्देश,
गळा सुखला पाय दुखले,
तरी पुढचे उपाय आखले.

रहा सुखी जर मिळाला असेल स्वर्ग,
बदलणार नाही तर थांबवेन माझे मार्ग,
पण काहीतरी शेवटची दे खबर,
पुढे तरी मोडणार नाही कंबर.