शेवटचे सांग

आणखी किती दूर जाशील,
आणखी किती परकी होशील,
कधीच परतणार नाहीस का दूर गेलेली,
विसरलीस काय वचने दिलेली.

मी मात्र आठवतोय सारे,
सोसतोय दिवस भले बुरे,
ना शोध ना कधी थांबलो मी,
थकल्यावर शोधतो राहिलेली कमी.

साऱ्यांनी घेतला अंत,
पण केवळ तुझ्यासाठीच राहिलो संत,
शेवट पर्यंत घेईन तुझा शोध,
पार करेन सारे अवरोध.

पण तू ही मदत कर छोटी,
वाया गेली माझी प्रयत्ने मोठी,
धुंडालता नाही आली दुनिया अथांग,
कुठे आहेस तेच शेवटचा सांग.